खुशखबर! राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार

महाराष्ट्रात २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. ही भरती ३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल.
शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० % गुण मिळवणे अनिवार्य आहे.
इथे हि वाचा