शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – या’ झाडांची लागवड करा आणि लाखो रुपये कमवा

तुम्ही देखील शेती सोबत नवीन बिजनेस आयडिया शोधत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे – घरातील फर्निचरमध्ये कित्येक वर्षांपासून महत्वाचा भाग राहिलेले सागवान आजही तितकेच लोकप्रिय आहे.

जर तुम्हाला या मौल्यवान असणाऱ्या सागवानाची जर लागवड करायची असेल तर जाणून घ्या विविध गोष्टी.

सागवानाची वैशिष्टये – मजबूत आणि महागड्या लाकडांमध्ये समावेश. दीर्घकाळ टिकून राहणारे आहे. फर्निचर-प्लायवूड-औषधी बनवण्यासाठी उपयोग होतो.

सागवान रोपाची लागवड – 8 ते 10 फूट अंतरावर लागवड करता येते. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 1 एकर शेत असेल तर तो त्यात सुमारे 500 सागवान रोपे लावू शकतो. 15°C ते 40°C तापमान सागवानासाठी अनुकूल मानले जाते.

कशी करायची लागवड ? – प्रथम शेत नांगरून त्यामधील तण व खडे काढून टाकावेत. यानंतर आणखी दोनदा नांगरणी करून शेतातील माती समतल करावी.

यानंतर, ज्या ठिकाणी सागवान रोपे लावायची आहेत त्या ठिकाणी चिन्हांकित करा. त्यानंतर त्या ठिकाणी खड्डा खणावा. काही दिवसांनी त्यात खत घालावे.

यानंतर त्यात एक रोप लावा. मातीचा pH 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.

कमाई किती होईल – एखाद्या शेतकऱ्याने एका एकरात सागवानाची 500 झाडे लावली, तर 12 वर्षांनंतर तो तब्बल एक कोटी रुपयांना विकू शकतो.

हि बिजनेस आयडिया आपण इतरांना देखील शेअर करा

1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी – या’ झाडांची लागवड करा आणि लाखो रुपये कमवा”

Comments are closed.