ABHA कार्ड ही प्रत्येक भारतीय नागरिकाची खास आरोग्य ओळख आहे. हे डिजिटल लॉकरसारखे आहे जे तुमचे वैद्यकीय इतिहास, चाचणी डिटेल्स आणि लसीकरण नोंदी यासारखे आरोग्य नोंदी सांभाळून ठेवते.
आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाइन
तुम्ही तुमच्या आरोग्याच्या नोंदी कुठूनही, केव्हाही मोबाइलला पाहू शकता आणि तुमच्या संमतीने ते तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्यांसह शेअर सुद्धा करू शकता.
ABHA कार्ड असण्याचे फायदे:
- अद्वितीय आणि विश्वासार्ह ओळख: तुमचा ABHA क्रमांक हा एक युनिक आयडेंटिफायर आहे जो हेल्थकेअर इकोसिस्टममधील विविध आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी वापरला जाऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही काळजी घेण्यासाठी कुठेही गेलात तरीही तुमचे आरोग्य रेकॉर्ड त्यांच्याकडे नेहमी उपलब्ध असतील.
- एकत्रित फायदे: तुम्ही तुमचे सर्व आरोग्य सेवा लाभ जसे की सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि विमा योजना तुमच्या ABHA क्रमांकाशी लिंक करू शकता. यामुळे तुमच्या फायद्यांचा तपास घेणे आणि तुम्हाला गरजेची असलेली काळजी तुम्हाला मिळत असल्याची खात्री करणे सोपे होईल.
- त्रास-मुक्त प्रवेश: तुमचा ABHA क्रमांक वापरून तुम्ही देशभरातील आरोग्य सुविधांमध्ये नोंदणीसाठी लांबलचक रांगा टाळू शकता. कारण तुमचा ABHA क्रमांक तुमचा हेल्थ आयडी म्हणून काम करेल, त्यामुळे तुम्ही काळजीसाठी नोंदणी करता तेव्हा तुम्हाला इतर कोणतेही कागदपत्र द्यावा लागणार नाही.
- सुलभ PHR साइन अप: तुमचा ABHA क्रमांक वापरून तुम्ही वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड (PHR) अर्जासाठी लगेच साइन अप करू शकता. हे तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्यांसह तुमचे आरोग्य रेकॉर्ड शेयर करण्यास अनुमती देईल.PHR हे एक सुरक्षित ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचणी अहवाल आणि लसीकरण नोंदी यासारखे तुमचे आरोग्य रेकॉर्ड सांभाळून ठेवते.
- हे पैसे वाचविण्यात मदत करू शकते: तुमच्या आरोग्याच्या नोंदींमध्ये प्रवेश करणे आणि शेअर करणे तुमच्यासाठी सोपे करून, ABHA कार्ड तुम्हाला अनावश्यक चाचण्या आणि प्रक्रिया टाळण्यास मदत करू शकते.
- Google Play Store किंवा Apple App Store वरून ABHA नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
- तुम्हाला भाषा निवडायचे ऑपशन दिसेल त्यात हिंदी किंवा इंग्लिश भाषा निवडा.
- पुढील स्क्रीन वर तुम्हाला अँप परमिशन हा पर्याय दिसेल त्यात सर्व माहिती वाचून i agree या पर्यायावर क्लिक करा.
- पुढील स्क्रीन मध्ये आभा address बनवण्यासाठी रेसजिस्टर या पर्यायवर क्लिक करा.
- पुढील स्क्रीन वर आभा नंबर समोर दिलेल्या “create now” या ऑपशन वर क्लिक करा.
- “create your ABHA number” या पर्यायाला निडवून continue बटण वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर तुमचा आधार नंबर बॉक्स मध्ये टाका आणि “i agree” व वर टिक करून नेक्स्ट बटन दाबा.
- ओटीपी ऑन आधार लिंक नंबर या पर्यायावर क्लिक करा,आणि मोबाइलला आलेला ओटीपी कोड आणि मोबाइलला आलेला ओटीपी कोड टाकून नेक्स्ट वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर टाका आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
- तुमची आभा नंबर प्रोफाइल तुमचा समोर येईल त्यात तुमचा आभा नंबर दिसेल तो लिहून घ्या आणि त्या खाली आभा ऍड्रेस मध्ये तुमचे पूर्ण नाव लिहा आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर डाउनलोड कार्ड या पर्यायावर क्लिक करा तुमचे कार्ड डाउनलोड होईल.
- आता बॅक टू लॉग इन वर क्लिक करा.
- आता सर्वात वर लॉग इन विथ मोबाईल नंबर वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर बॉक्स मध्ये टाका.
- मोबाइलला आलेला ओटीपी कोड टाकून नेक्स्ट वर क्लिक करा, तुमचा नावाचा एक बॉक्स येईल त्यावर क्लिक करा आणि लॉग इन बटन दाबा.
- i agree या हिरव्या बटनावर क्लिक करा.
- लिंक टू माय हेअल्थ रेकॉर्ड वर क्लिक करून तुम्ही तुमचे हेअल्थ रेकॉर्ड कार्डसोबत जोडू शकतात.
अशा प्रकारे तुम्ही हे कार्ड बनवू शकतात तुमचा फोटो गॅलरीत हे कार्ड सेव झालेले असेल.
कार्ड बनवायचा आधी तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असल्याची खात्री करा.
ABHA कार्ड ही सरकारने जारी केलेले आहे का?
होय, ABHA कार्ड ही सरकारने जारी केलेली डिजिटल आरोग्य ओळख आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) चा एक भाग म्हणून भारत सरकारने २०२० मध्ये हे लॉन्च केले आहे.ABHA कार्डची व्हॅलिडिटी नाही. हा कायमस्वरूपी आरोग्य आयडी आहे जो व्यक्तीच्या आयुष्यभरासाठी वैध असेल