दिवाळीच्या काळात बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार असे आशादायी चित्र तयार होत आहे. वास्तविक, सोयाबीन हे असे पीक आहे जे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादनाची आणि उत्पन्नाची हमी देते..
यंदा तर परिस्थिती फारच बिकट आहे. यंदा मान्सून काळात सरासरी असा पाऊस बरसला नसल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त केली जात. शेतकऱ्यांना एकरी तीन-चार क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळेल असे वाटतं आहे
कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले जात होते. पण आता सोयाबीन बाजारभावाने हमीभावाचा टप्पा पार केला आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये आता सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक दरात विक्री होत आहे.
यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्याने होरपळलेला बळीराजाला आता कुठे दिलासा मिळत आहे. काल झालेल्या लिलावात राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनला 5000 पेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होईल असे सांगितले जात आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर
मेहकर : काल अर्थातच 4 नोव्हेंबर रोजी मेहकरच्या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4500, कमाल 5280 आणि सरासरी चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
जालना : जालनाच्या मार्केटमध्ये कालच्या
लिलावात सोयाबीनला किमान 4000, कमाल 5150 आणि सरासरी 4800 एवढा भाव मिळाला आहे.