🎯 किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम | kisan credit card update
🎯 किसान भागीदारी कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमचे आयोजन.
🎯 किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमेचे 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
🎯 प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ मिळणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे.
🎯 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सुरू असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) वाटपासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे.
🎯 या मोहीमेअंतर्गत दिनांक 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजीत करण्यात येणार आहेत.
🎯 सध्या राज्यात लाखो शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असून त्यापैकी अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड पासून वंचित आहेत.
🎯 याकरीता विशेष ग्रामसभा आयोजीत करून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाईल या मोहिमेत शासनाचे कृषी, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन विभाग, नाबार्ड आणि सर्व बँका सहभागी होणार आहेत.
🎯 ही मोहीम सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे.
🎯 राज्यातील सर्व बँका त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये केसीसी अर्ज उपलब्ध करून देतील व शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून केसीसी स्वरूपात पीककर्ज वाटप करतील.