Farmer Scheme:शेतकऱ्यांसाठी नवीन योजना “गाव तिथे गोदाम”, Gav Tithe godam अर्ज पात्रता सविस्तर माहिती..
नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अनेक Farmer Scheme नवीन शेतकरी योजना याची सविस्तर माहिती,शासन निर्णय, बाजार भाव, राजकीय बातम्या, याविषयी सविस्तर माहिती घेत असतो. कारण शेतकरी हा शेतामध्ये काम करत असतो व शेतामध्ये काम करत असताना त्याला नवीन नवीन शासकीय Farmer Scheme योजनांची माहिती होत नाही. शेतकरी बंधूंनो आपल्या न्यूज पोर्टलचा हात उद्देश आहे की शासनाच्या सर्व योजना तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या. कारण योजना ह्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या तरच शेतकरी त्या योजनांचा फायदा घेऊ शकतो अन्यथा शेतकरी बांधव हे योजनेपासून दूर राहतात व त्यांना त्या Farmer Scheme योजनेची माहिती नसल्यामुळे त्या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही. मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना Farmer Scheme घेऊन आलो आहोत ती योजना म्हणजे गाव तिथे गोदाम.
मित्रांनो सध्याच्या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ही फार बिकट आहे कारण कांद्याला बाजार भाव नाही व अवकाळी पावसामुळे कांद्याचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला यावर 13 मार्च रोजी शिंदे सरकारने एक मोठा शासन निर्णय Farmer Scheme घेतला आहे तो म्हणजे गाव तिथे गोदाम तर चला या योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊया.
उद्देश
1) शेती प्रक्रिया व कृषी विषयक साधनसामग्री साठवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत
2) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना साठवणुकीची क्षमता निर्माण करणे.
3) शेतकऱ्यांना कमी भावामध्ये आपला शेतात तयार होणारी पीक विकायला लागू नये यासाठी साठवणुकीसाठी गोदाम निर्माण करणे.
4) कृषी प्रक्रियेतील योजनेचे पुनर्जीवन करणे
5) नाबार्डच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
आर्थिक पुरवठा/ भांडवल
गाव तिथे गोदाम योजना राबवण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अभ्यास समिती
गाव तिथे गोदाम योजना Farmer Scheme राबवण्यासाठी एक अभ्यास समिती तयार करण्यात आले असून तीन महिन्यात ती समिती आपला अहवाल राज्य शासनास देणार आहे.
अभ्यास समितीच्या अभ्यासानंतर शेतकऱ्यांना गाव तिथे गोदाम योजना राबवण्यास मंजुरी देण्यात येईल
शासन निर्णय सविस्तर माहिती
प्रस्तावना :-
राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी विषयक साधनसामुग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे, कृषी
प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, वित्तपुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतमालाचा होणारा अपव्यय व विघाड रोखणे, गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, भारतातील कृषी गोदामांच्या बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे, जेणेकरून ते शेतकरी त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील. गाव तेथे गोदाम ही योजना राज्यस्तरीय राबविण्याकरीता नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) यांच्या ग्रामीण भंडारण योजना यामध्ये नमूद उद्देश, निकष, मार्गदर्शक तत्त्वे, अनुदान यांचा प्राथमिक स्तरावर विचारविनियमन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने “गाव तेथे गोदाम” या योजनेकरीता अभ्यास समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील शेतकन्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करण्यासाठी, मालाचे नुकसान टाळण्यासाठी व शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये, याकरिता “गाव तेथे गोदाम” ह्या प्रस्तावित योजनेकरीता खालीलप्रमाणे अभ्यास समिती गठीत करण्यात येत आहे.
सदर अभ्यास समितीचे मुख्यालय हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे येथे असेल. उपरोक्त
गठीत अभ्यास समितीने बैठक आयोजित करून “गाव तेथे गोदाम या योजनेचा अभ्यास करून तीन
महिन्यात अहवाल शासनास सादर करावा.
उक्त अभ्यास समितीवर शासकीय गट-अ श्रेणीतील अधिकारी प्रतिनिधींची नियुक्ती
प्रशासकीय विभागाने त्यांच्या विभागप्रमुखांच्या मान्यतेने करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०३१३११५४३८६८०२ असा आहे. हा डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
इथे हि वाचा
Short Term Loan loan एका क्लिकवर शॉर्ट टर्म लोनचे फायदे जाणून घ्या……
खुशखबर! राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार