अमरावती, 25 मार्च (हिं.स.) : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. योजनेत पात्र ठरलेल्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मार्च महिन्यात बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. निकषात बसत नसतानाही महिला लाडकी बहीण म्हणून लाभ घेत आहेत. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन घरात कार आहे का, याची तपासणी करीत आहेत. जिल्ह्यात दोन हजार ४१९ अंगणवाडी सेविका आहेत. त्या घरोघरी जात आहेत. यामुळे अनेक लाभार्थ्यांची धाकधूकही वाढली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा,
यासाठी ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. विधानसभा निवडणूक असल्याने सरसकट लाभदेण्यात आला. मात्र, आता शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत असल्याने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात दरमहा २,१०० रुपये देण्याच्या घोषणेचा विसर पडल्याने बहिणींकडून नाराजी व्यक्त होत आहे. तर, आर्थिकदृष्ट्या संपन्न महिलाही लाभ घेत असल्याची बाब निदर्शनास आली. यामुळे नवीन निकष व अटींमुळे लाभ घेतलेल्या बहिणी आता अपात्र ठरत आहेत.
जिल्ह्यात एकूण ७लाख १९ हजार ८५० महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६ लाख ९२ हजार ५६३ अर्ज पात्र ठरले. कागदपत्रांच्या पडताळणीत अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा वाढत जाऊन तो आता २७ हजार ३१७वर पोहोचला आहे. बॉक्स पती नोकरीवर असतानाही हव्यास • कर भरणारे आणि पती नोकरीवर असतानाही दीड हजार रुपये मिळविण्यासाठी अर्ज केले. त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. मात्र, या योजनेचा भार २ सरकारच्या तिजोरीवर चांगलाच वाढत चालला आहे. यामुळे कर भरणाऱ्यांवर अपात्रतेची फुली मारण्यात येत आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची श्रीमंती तपासत आहेत. ही मोहीम येत्या काही दिवसात आणखी तीव्र होईल. —————