Second Car कारसाठी लोन घेताय ? जाणून घ्या या गोष्टी

जर तुम्ही सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल सेकंड हँड कार जर तुम्ही 3 वर्ष जुनी कार घेत असाल तर काही बँक किंवा नॉन बँक कर्ज देत नाही

आपल्याकडे एखादी कार असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेकांना नवी कार घेणं परवडत नाही. असे लोक सेकंड हँड कार (Used Cars) घ्यायला प्राधान्य देतात किंवा काहीजण पैसे वाचवण्यासाठीही नवी कार घेण्यापेक्षा सेकंड हँड कार (Second hand cars) घेतात. त्यामळं सेकंड हँड कार वापरण्याची संकल्पना आपल्याला फारशी अपरिचित नाही. लॉकडाऊन झाल्यापासून सार्वजनिक वाहतुकीऐवजी आता लोकांनी खासगी वाहनांचा अधिक वापर करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत लोक वापरलेली कार खरेदी करण्यातही मागे नाहीत. हे खरेदी केल्याने त्याचे फायदेही आहेत. आजच्या काळात कार ठेवणे हा देखील मोठा खर्च आहे, अशा परिस्थितीत तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करून बचत देखील करू शकता. जर तुम्हालाही सेकंड हँड कार घ्यायची असेल आणि त्यासाठी कर्ज (Car loan for used cars) घ्यायचे असेल तर त्याआधी आम्ही येथे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत, ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

1. जर तुम्ही तीन वर्षांपेक्षा जुनी सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की, अनेक बँका आणि नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या अशा परिस्थितीत कर्ज देत नाहीत. बहुतेक बँका आणि NBFC 100 टक्कापर्यंत फायनान्स देतात.

2. वापरलेली कार खरेदी करताना विम्याची किंमत कर्जाच्या रकमेत समाविष्ट केली जाणार नाही याची शक्यता जास्त असते.

3. नवीन कार खरेदीच्या तुलनेत सेकंड हँड कारसाठी घेतलेल्या कर्जावर तुम्हाला जास्त कर्ज द्यावे लागेल.

4. सेंकंड हँड कारसाठी कर्ज घेताना, EMI रक्कम आणि परतफेडीच्या अटी काळजीपूर्वक वाचा. जर तुम्ही मुदतपूर्व कर्जाची परतफेड केली, म्हणजे कर्जाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही कर्ज फेडलं तरीही काही बँका यासाठी दंड आकारतात.

5. कोणत्याही कर्जाप्रमाणे, सेकंड हँड कारच्या कर्जासाठी, तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील आणि सर्व कागदपत्रे पूर्ण करावी लागतील. कर्जाचा फॉर्म, आयडी पुरावा आणि पत्त्याचा पुरावा सोबत, तुम्हाला कर्ज मंजूर करण्यासाठी वाहन मूल्यांकन अहवाल देखील सादर करावा लागेल. यासोबतच, तुम्ही पगारदार कर्मचारी असाल किंवा तुमचा व्यवसाय चालवत असाल, तुम्हाला तुमचे उत्पन्न प्रमाणपत्रही द्यावे लागेल

6. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असल्यास, तुमचा कर्ज अर्ज फेटाळला जाऊ शकतो किंवा तो नाकारला गेला नाही तरीही, व्याजदर तुलनेने जास्त असू शकतो. एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही एखाद्याचा सह-अर्जदार बनून वापरलेल्या कारच्या कर्जासाठी देखील अर्ज करू शकता.

2 thoughts on “Second Car कारसाठी लोन घेताय ? जाणून घ्या या गोष्टी”

  1. Pingback: मोठी घोषणा...सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड आता थेट जनतेतून

  2. Pingback: भारत-पाकिस्तान सामन्यानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला, म्हणाला… - Solapurviralnews

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *