महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जनजागृती करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ च्या धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तीक घरगुती शौचालय आणि सामुदायिक शौचालय बांधण्याचा निर्णय राबवण्यात येणार आहे, असं शिंदे म्हणाले.
इथे हि वाचा
अतिवृष्टी नुकसान भरपाई बघा जिल्ह्यानुसार यादी
आता घरबसल्या मागवा तुमचे मतदान ओळखपत्र
आपल्या गावाची मतदान यादी पहा मोबाईलवर
Pingback: सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे - कर्ज योजना