प्रयागराज , 16 फेब्रुवारी (हिं.स.) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नी आणि कुटुंबासह महाकुंभ संगमात स्नान करून पूजा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गंगा स्नान आणि दर्शन पूजा खूप छान झाली. आपल्या नागपूर शहरातून हजारो लोक आपली वाहने घेऊन येथे येत आहेत. आम्हाला वाटते की प्रत्येकाला गंगा मातेचा आशीर्वाद मिळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर पवित्र स्थानाचे फोटो पोस्ट केले आहेत. आज प्रयागराज महाकुंभात, मला पवित्र संगमात स्नान आणि पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले! शुद्ध, निर्मळ माता गंगेचा आशीर्वाद मिळाला, असं म्हटलं.
महाकुंभाचा आज ३५ वा दिवस होता. आत्तापर्यंत ५१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केले आहे. महाकुंभाला अजून १० दिवस बाकी आहेत. त्यामुळे इथं स्थान करणाऱ्यांची संख्या ५५ कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याआधी गडकरी कुटुंबासह प्रयागराजला पोहोचले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी गृह सचिव संजय प्रसाद हेही उपस्थित होते. महाकुंभ स्नानासाठी गडकरी आल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.
Also Read
कुंभमेळ्याला जाण्यासाठी सोलापूरकरांना दौंडवरून रेल्वे
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ जाहीर
मोफत योजनांमुळे लोक काम करण्यास अनुत्सुक – सर्वोच्च न्यायालय