मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : ऍमेझॉन वेब सर्विसेस स्पेस एक्सीलरेटर: इंडिया हा एक तांत्रिक, व्यवसाय आणि मार्गदर्शन कार्यक्रम आहे जो अंतराळ तंत्रज्ञानामध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि 24 सहभागी स्टार्टअप्सच्या यादीमध्ये थुथुकुडी, तामिळनाडू येथील लॉन्च व्हेईकल आणि सस्टेनेबल सॅटेलाइट स्टार्टअप; पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांवरून ऍडवान्सड जिओस्पेसियल विश्लेषण स्टार्टअप; अहमदाबाद, गुजरात इ येथील सॅटेलाइट टेकनॉलॉजी आधारित प्रिसिजन फार्मिंग स्टार्टअपचा समावेश आहे.
एडब्ल्यूएस मधील एरोस्पेस आणि सॅटेलाइट व्यवसायाचे संचालक, क्लिंट क्रोझियर म्हणाले, “ एडब्ल्यूएस चा स्पेस एक्सीलरेटर कार्यक्रम चौथ्या वर्षात आहे, परंतु तो पहिल्यांदाच एखाद्या देशासोबत भागीदारी करत आहे.”
क्रोझियर म्हणाले, “आम्ही हा देश-केंद्रित अंतराळ एक्सीलरेटर कार्यक्रम चालवण्यासाठी भारताची निवड केली कारण भारतामध्ये अंतराळ क्षेत्रातील वाढीची अफाट क्षमता आहे. भारतात अनेक नवीन स्पेस स्टार्टअप विकसित होत आहेत. भारत सरकार देखील यामध्ये आपले पूर्ण सहकार्य करत आहे, जे आमच्या इसरो आणि इन-स्पेस सोबतच्या सामंजस्य कराराने प्रमाणित केले आहे. स्पेस टेकनॉलॉजी क्षेत्रात भारतामध्ये जगातील सर्वात सुशिक्षित आणि कुशल प्रतिभा आहे. अनेक प्रतिभावान स्टार्टअप्सना या रोमांचक कार्यक्रमात भाग घेताना पाहून आम्ही उत्साहित आहोत.”
एडब्ल्यूएस इंडिया चा पहिला स्पेस एक्सीलरेटर कार्यक्रम हा १४ आठवड्यांचा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश अंतराळ क्षेत्र आणि टेक्निकल विशेषज्ञ द्वारे टेक्निकल कौशल्य, एडब्ल्यूएस प्रशिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करणे आहे. एडब्ल्यूएस स्पेस एक्सीलरेटर इंडिया कार्यक्रम जुलै/ऑगस्ट 2024 मध्ये आयोजित केला जाईल. यामध्ये 24 स्टार्टअप्सना एडब्ल्यूएस टी-हब, मिनफी आणि स्पेस क्षेत्रातील नेत्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय दाखविण्याची संधी मिळेल.