पुढच्या महिन्यात बँकांना एवढ्या दिवस सुट्ट्या, आरबीआयने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

एप्रिल महिन्यामध्ये भारताचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे, आर्थिक कामांसाठी मार्च आणि एप्रिल महिना हा अत्यंत महत्वाचा मानला जातो, परंतु यावर्षी आरबीआयने एप्रिल महिन्यात बँकांना वायफळ सुट्ट्या दिल्या आहेत.

त्यामुळे येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यात तुमची काहीही बँकेसंबधी आर्थिक काम असतील तर लवकर पूर्ण करून घ्या, कारण नुकताच आरबीआयने एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे.
एप्रिल महिन्यामध्ये बँकांना सुट्ट्या असल्यामुळे तुमच्या आर्थिक कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, परंतु ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे नेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सुरु राहणार आहे

त्यामुळे तुमची आर्थिक कामे तुम्ही UPI च्या मदतीने करू शकता.

एप्रिल 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी
1. 1 एप्रिल , 2023 (शनिवार): बँक खाते वार्षिक बंद करणे
2. 2 एप्रिल 2023 (रविवार): सुट्टी

3. 4 एप्रिल 2023 (मंगळवार) – महावीर जयंती निमित्त सुट्टी
4. 5 एप्रिल 2023 (बुधवार) – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन

5. 7 एप्रिल 2023 (शुक्रवार) – गुड फ्रायडे सुट्टी

6. 8 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा दुसरा शनिवार

7. 9 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी

8. एप्रिल 14, 2023 (शुक्रवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / बोहाग बिहू / चिराओबा / बैसाखी / बैसाखी / तामिळ नववर्ष दिन / महा बिसुभा संक्रांती / बिजू उत्सव / बिसू उत्सव

9. एप्रिल 15, 2023 (शनिवार) – विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिवस / बंगाली नववर्ष दिवस

10. 16 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी

11. 18 एप्रिल 2023 (मंगळवार) – शब-ए-कद्र निमित्त सुट्टी

12. 21 एप्रिल 2023 (शुक्रवार) – ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा सुट्टी

13. 22 एप्रिल 2023 (शनिवार) – महिन्याचा चौथा शनिवार आणि रमजान ईद (ईद-उल-फित्र)

14. 23 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी

15. 30 एप्रिल 2023 (रविवार) – सुट्टी