सोलापूर, 20 मार्च (हिं.स.)।
प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगारांना इंटर्नशीपची संधी दिली जाणार आहे. ही योजना ही सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य वृध्दीसाठी व रोजगाराच्या संधीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात,
या अंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल या सोबतच त्यांना दरमहा 5000 रुपये ही मिळतील या शिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर 6000 रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल. भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांना इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी. संधींबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी व संबंधित रोजगार संधींच्या अनुषंगाने अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे दुरध्वनी क्र.0217-2992956 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे.