Police Recruitment पोलीस भरती होणार आता कंत्राटी पद्धतीने 2023

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मुंबई | मुंबई पोलीस दलात 3 हजार कंत्राटी पोलिसांची भरती (Mumbai Police Recruitment 2023) करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. Mumbai Police Recruitment 2023 – मुंबई पोलीस दलासाठी शिपाई ते सहाय्यक निरीक्षक यांची 40823 पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 10 हजार पदे रिक्त आहेत.

यामुळे दैनंदिन कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीतजास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद झाला असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरती केली जाणार आहे. राजकीय नेत्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

इथे हि वाचा

एवढी रक्कम आता घरामध्ये ठेऊ शकतो – income tax new rule

मोफत शिलाई मशीन मिळणार घरपोच

महिलांना या Bus मध्ये मिळणार ५०% सवलत

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon