pm Modi Yojana
देशातील महिलांनी स्वावलंबी होऊन स्वत:चे पैसे कमावता यावेत, त्यांना कोणावही अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी सरकारकडून अनेक योजना आणल्या. महिलांना रोजगार देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Free Silai Machine Yojana 2022 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील गरीब आणि कष्टकरी महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन मोफत देण्यात येणार आहे.
मोफत शिलाई मशीन योजना 2022 अंतर्गत, देशातील विधवा आणि अपंग महिला तसेच कामगार महिला लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांचे वय २०वर्षे ते ४०वर्षे असावे. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या शिलाई मशीनच्या मदतीने महिला स्वत:चा व्यवसाय करून सहजपणे घर सांभाळू शकतात.
तुम्हाला जर मोफत शिलाई मशीन योजना 2022 मिळवायची असेल तर Free Silai Machine Yojana चे उद्दिष्ट काय आहे, वयोमर्यादा काय आहे, फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, पात्रता आणि फ्री शिलाई मशीन योजना आवश्यक कागदपत्रे काय आहेत, संपर्क क्रमांक, फ्री शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न त्याबद्दल सविस्तर माहिती या लेखात बघूया.
जर इच्छुक कामगार महिलांना या पीएम फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना प्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथून अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक इ. भरावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी जोडून तुमची सर्व कागदपत्रे संबंधित कार्यालयात जोडावी लागतील. यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयीन अधिकारी करतील.पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता
पीएम मोफत सिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षे असावे. या पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेंतर्गत नोकरदार महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 12000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. पंतप्रधान मोफत शिलाई मशीन 2021 अंतर्गत, देशातील केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच पात्र असतील. देशातील विधवा आणि अपंग महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड ,वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र ,अपंगत्व असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र, महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र, मोबाईल नंबर ,पासपोर्ट आकाराचा फोटो.
प्रत्येक राज्यातील 50000 हून अधिक महिलांना प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना दिली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांमध्ये ही योजना सुरू झाली आहे.
इथे हि वाचा
सावधान ऑनलाइन लोन घेताय पटकन डिलीट करा हे 23 ऐप्स-online loan scam apps