नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स.) : दिल्लीतील 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना 31 मार्चनंतर पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याची घोषणा पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी आज, शनिवारी केली. राजधानीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, दिल्लीत 15 वर्षांहून जुन्या वाहनांची ओळख पटविण्यासाठी एक विशेष पथक तयार केले जाईल. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शहरातील मोठी हॉटेल्स, काही मोठी ऑफिस कॉम्प्लेक्स, दिल्ली विमानतळ, मोठ्या बांधकाम स्थळांना प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी त्वरित अँटी-स्मॉग गन बसवणे बंधनकारक असणार आहे. क्लाउड सीडिंगसाठी आम्हाला आवश्यक असलेली कोणतीही परवानगी घेऊ आणि दिल्लीमध्ये जेव्हा गंभीर प्रदूषण असेल तेव्हा क्लाउड सीडिंगद्वारे पाऊस पाडता येईल आणि प्रदूषण नियंत्रित करता येईल याची आम्ही खात्री करू असे सिरसा यांनी सांगितले.————————–