जम्मू, 26 फेब्रुवारी (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी परिसरात आज, बुधवारी जिहादी दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनावर गोळीबार केला. राजौरीतील नियंत्रण रेषेजवळ हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर लष्कर सतर्क झाले असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) फाल गावात जिहादी दहशतवाद्यांनी आज, बुधवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दुपारी दीड वाजेच्या सुमाराला सुंदरबनीपासून सुमारे 6 किमी अंतरावर पांडवांनी बांधलेल्या ऐतिहासिक गंडेह मंदिराशेजारी असलेल्या जंगलाजवळ हा हल्ला झाला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्या भागातून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर काही राऊंड गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराने या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने एका घुसखोराला ठार केले होते. यानंतर काही तासांतच राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ल्याची घटना घडली आहे.
यापूर्वी राजौरी येथील केरी सेक्टरमध्ये 8 फेब्रुवारी रोजी एलओसी जवळच्या जंगल भागातून दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर गोळीबार केला होता. त्याला भारतीय सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तत्पूर्वी 4 आणि 5 फेब्रुवारीच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भूसुरुंग स्फोटात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता.
इथे हि वाचा
राज्यात 6 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता
उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला
पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात