ब्रेकिंग! टीम इंडिया वीस वर्षांचा दुष्काळ संपवणार?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी टीम इंडियाआणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना धर्मशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर खूपच भारी पडला आहे.

टीम इंडियाने २००३ वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडवर शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर वीस वर्षे उलटून गेली आहेत, अजून एकदाही टीम इंडिया न्यूझीलंडला पराभूत करू शकला नाही.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ आतापर्यंत नऊ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी पाच सामन्यांमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर केवळ तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

हे दोन्ही बलाढ्य संघ १९७५ मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले होते. दरम्यान २०१९ च्या वर्ल्डकप स्पर्धेतील टीम इंडिया – न्यूझीलंड यांच्यात झालेला सेमी फायनलचा सामना कुठलाही क्रिकेट फॅन विसरू शकत नाही. या सामन्यात पराभूत झाल्यामुळे टीम इंडियाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न हुकले होते.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon