icc world cup 2023 ब्रेकिंग! वर्ल्डकप कोण जिंकणार? रजनीकांतची भविष्यवाणी व्हायरल

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

icc world cup 2023 टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सेमी फायनल सामना खेळला गेला. या रंगतदार सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, या सामन्याला राजकारणी ते कलाकार आणि आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. 

त्यात बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते रजनीकांत यांच्याही नावाचा समावेश होता. ते टीम इंडियाचा खेळ पाहून खूपच खुश झाले होते. अशात टीम इंडियाविषयी रजनीकांत यांची प्रतिक्रिया आता चर्चेत आहे. वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी रजनीकांत यांनी विजयी संघाविषयी भविष्यवाणी केली आहे.

रजनीकांत यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले की, सेमी फायनल सामन्यात आधी मला भीती वाटली. नंतर जेव्हा न्यूझीलंडचे विकेट्स पडत गेल्या, तेव्हा सर्व काही ठीक झाले. त्या दीड तासादरम्यान मी खूपच घाबरलो होतो, पण मला शंभर टक्के विश्वास आहे की, यंदा वर्ल्डकप आपलाच आहे.

दरम्यान कोट्यवधी क्रिकेटप्रेमी रविवारी होणाऱ्या टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील फायनल सामन्यासाठी उत्सुक आहेत. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी दोन वाजता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे सुरु होणार आहे.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon