Gold Price : डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोने तेजीत, सोने खरेदीचा योग्य दर काय?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Gold Price Today : एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold Price At All Time High : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आणणार असल्याचे म्हटल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किमतीत उल्लेखनीय तेजी आली आहे. त्यानंतर शुक्रवारी, एमसीएक्स गोल्ड फ्युचर्समध्ये सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने ८०,३१२ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला तर स्पॉट मार्केटमध्ये सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान फ्युचर्सच्या किमती आणि स्पॉट मार्केट किमतींमधील फरक सोन्यावरील ३% जीएसटी आणि त्याच्या प्रीमियममुळे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणामुळे सोन्याला झळाली

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले की, “दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भाषणामुळे सोन्याच्या किमतीत तेजी आली आहे.” गुप्ता पुढे म्हणाले की, “जानेवारीमध्ये आतापर्यंत एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सच्या किमतीत ४.५% किंवा ३,४४८ रुपयांची वाढ झाली आहे.” शुक्रवारी सोन्याने ८३,००० रुपयांचा टप्पा ओलांडल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दला आहे

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon