Gai gotha anudan yojana | गाय गोठा अनुदान योजना : शरद पवार ग्राम समृद्धी योजना,
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Gai Gotha Anudan Yojana आहे
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई, म्हशी, शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
गाय गोठा योजनेच्या अटी
Gai Gotha Yojana 2023 Terms & Condition
फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
उपलब्ध पशूंचे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक
या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
शेतकऱ्याने जर या आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या एख्याद्या योजनेअंतर्गत गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल