मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, मात्र बंद होणार नाही – अजित पवार

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, मात्र बंद होणार नाही - अजित पवार

मुंबई, 17 मार्च (हिं.स.) – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ आता आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो’, असेही ते म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.

पवार म्हणाले की, या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ, हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. योजनेतून दरमहा १५०० रुपयांची थेट रोख रक्कम महिलांना मिळत आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल शासनाने उचलले आहे. लाडकी बहिण योजनेचे खाते उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतचे कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत.

ज्या महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढावी म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. सुमारे ४५ हजार कोटी रुपये वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून महिला सक्षम होतील, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल.

‘लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही. तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण, हा थोडा थोडका पैसा नाही. सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल.’ तर यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेत हा पैसा येणार असून अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळणर असल्याचेही पवारांनी नमूद केले आहे.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon