cast validity document in marathi | जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

नमस्कार आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत कास्ट व्हॅलेडीटी म्हणजे काय ? “जातवैधता प्रमाणपत्र” हे एक खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहे म्हणजे प्रत्येक अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गाच्या विद्यार्थी कडे असणे आवश्यक आहे.त्यामुळे caste validity certificate हे डॉक्युमेंट अतिशय आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला caste validity certificate काढण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची यादी घेऊन आलोय. जात वैधता प्रमाणपत्र माहिती । Caste Validity Documents in Marathi हा लेख तुम्हाला कास्ट व्हॅलिडीटी काढण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.

caste validity certificate documents in marathi

जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे.

Caste Validity Required Documents list in Marathi

1. जातीचा दाखला (Caste Certificate)

2. अर्जदाराचा मराठी शाळा सोडल्याचा दाखला ( Z.P Leaving Certificate )

3. अर्जदाराचा वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला ( Father Z.P Leaving Certificate )

4. वडील हयात नसल्यास मृत्यू दाखला ( वडील नसल्यास काका आत्या यांचा वरील प्रमाणे पुरावा )

5. आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला ( Grand Father Z.P Leaving Certificate )

आजोबा शाळा शिककेले नसल्यास किंवा शाळेचा दाखला नसेल तर इतर पुरावा जोडणे

6. कुटुंबाचे वंशावळ ( 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर )

7. प्रतिज्ञापत्र ( नमुना 17. शैक्षणिक कामासाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी. नमुना 11 व 21 निवडणूक करिता. )

8. नातलगांची Validity Certificate असल्यास झेरॉक्स

( वडील,भाऊ,बहिण,काका,आत्या)

9. आजोबा जिवंत नसल्यास मृत्यू दाखला.

10. अर्जदार इयत्ता (12 वी ) बारावीत असल्यास बोनाफाईड जोडणे आवश्यक.

11. अर्जदार हा ( BA , B.sc, B.com, MA, M.sc, M.com, Engg., Pharmacy ) असल्यास ऍडमिशन पावती जोडणे

इथे हि वाचा

मतदान यादीत नाव शोधणे

लेक लाडकी योजना सुरू- lek ladki yojana marathi 2023

६ एअर बॅग असलेली एसयूव्ही फक्त १ लाख भरून घेऊन या