सोलापूर, 25 फेब्रुवारी
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत. दोघे एकत्र आले तरी महायुतीला फटका बसणार नाही. कारण दोघांचेही राजकारण संपलेले आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, के. डी कांबळे, सुशील सरवदे आदी उपस्थित होते
आठवले म्हणाले, येत्या जिल्हा परिषद, मनपा निवडणुकांमध्ये आरपीआयला जागा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एक एमएलसी तसेच एका मंत्रिपदाची मागणी त्यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांसाठी ही मागणी केली होती. आता महामंडळावर माझे कार्यकर्ते दिसतील. ऑक्टोबरदरम्यान निवडणुका होतील. यात आरपीआयला चांगल्या जागा सुटतील, तशी चर्चा झाली आहे.
इथे हि वाचा
पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात
Car ची बॅटरी डाऊन झाली? या पद्धतीने सहज सुरू करा गाडी!
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात पृथ्वीवर येण्याची शक्यता