या खेळाडूंच्या पारितोषिकाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ राज्यशासनाचा निर्णय- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

या खेळाडूंच्या पारितोषिकाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ राज्यशासनाचा निर्णय- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार

महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविण्याऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे. तसेच ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक-कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तीनी क्रीडा क्षेत्रासाठी आपले सर्वस्व पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतित केले आहे, अशा जेष्ठ क्रीडर्षींचा गौरव करण्यासाठी सन २००१-०२ पासून महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणली आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांकरीता शासन निर्णय दि.१४.१२.२०२२ अन्वये सुधारीत नियमावली तयार करण्यात आली असून त्यामधील परिशिष्ट-अ नुसार पुरस्काराचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त व्यक्तींना रु.३,००,०००/- (अक्षरी रूपये तीन लक्ष फक्त) व इतर पुरस्कार प्राप्त व्यक्तींना रु.१,००,०००/- (अक्षरी रूपये एक लक्ष फक्त) इतकी पारितोषिकाची रक्कम अदा करण्यात येत होती. सदर पुरस्काराच्या रक्कमेत वाढ राज्यशासनाने केली असून पुढील प्रमाणे आहे.
पूर्वी- 3 लाख तर आता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराची रक्कम :- 5 लक्ष

पूर्वी 1 लक्ष – उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन पुरस्कार :- 3 लक्ष
अशी करण्यात आली आहे.