PM कुसुम सोलर पंप योजना
३,५ आणि ७.५ HP क्षमतेचे सौर पंप
सर्वसाधारण प्रवर्ग एकूण पंपाच्या किंमतीच्या ९०% एवढं अनुदान
अनुसुचित जाती-जमाती प्रवर्ग एकूण पंपाच्या किंमतीच्या ९५ % अनुदान
PM कुसुम सोलर पंप योजना
३ एचपी पंप
एकूण किंमत – १,९३,८०३ रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – १९,३८० रुपये एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – ९६९० रुपये
५ एचपी पंप
एकूण किंमत- २,६९,७४६ रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा – २६,९७५ रुपये एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा -१३,४८८ रुपये
७.५ एचपी पंप
एकूण किंमत – ३,७४,४०२ रुपये सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा- ३७,४४० रुपये एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा – १८,७२० रुपये
पंपासाठी जमिनीचा निकष काय?
अडीच एकरपर्यंत जमीन धारकास ३ एचपी पंप अडीच ते ५ एकरपर्यंत जमीन धारकास ५ एचपी पंप ५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास ७.५ एचपी पंप
पात्रतेचे निकष आणि कागदपत्रे
१. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
२. शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
३. अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
कागदपत्रे
१. सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
२. सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
३. आधार कार्ड
४. जातीचा दाखला
५. बँक पासबुक फोटो
६. पासपोर्ट आकाराचा फोटो
ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध
PM कुसुम सोलर पंप योजना