शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! पिक विमा भरण्याची मुदत वाढवली, पहा किती दिवस

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा भरण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 4 आणि 5 डिसेंबर 2023 पर्यंत पिकविमा Crop insurance भरता येणार आहे

कोकणातील आंबा, काजू, संत्रा, रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 होता. मात्र, काही शेतकऱ्यांना विविध तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा भरता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून केंद्र सरकारने अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. फळपिकांचा पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर होती. मात्र काही शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळं पीकविमा भरू शकले नाहीत,

याचा विचार करून केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली असून दिनांक 4 आणि 5 डिसेंबर या दोन दिवसात वरील पिकांचा विमा भरता येणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरुन या योजनेत सहभागी व्हावं असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.