आता राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजना – आताच करा अर्ज.
आज दिव्यांग दिन राज्यशासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत, अश्याच आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगासाठी ई-मोबाईल शॉप ही योजनेची अंमलबजावणी केली आहे.
दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल
योजनेच्या अटी व शर्ती:
१ ) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
२) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४० टक्के असावे तसेच
जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
३) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
४) अर्जदार हा १८ ते ५५ या वयोगटातील असावा.
आता राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल
५) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
६) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.
७) लाभार्थी निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य
दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
आता राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींना मोफत मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल
८) अतितीन दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक
नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याचा (Escort) सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
९) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच सबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
१०) जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
११) अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
१२) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
१३) राज्यातील इतर कोणत्याही योजने अंतर्गत मोफत ई-व्हेईकल प्राप्त झालेल्या दिव्यांग लाभार्थीस सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी
अर्जदार नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध https://evehicleform.mshfdc.co.in/
दि.०३.१२.२०२३ पासून ते दि. ०४.०१.२०२४ सकाळी १०.०० वाजे पर्यत अधिक माहितीसाठी हेल्प लाईन क्रमांक: +918035742016
महाराष्ट्र शासन