समाज कल्याण विभागाच्या तब्बल इतक्या योजना| आपण लाभ घेतलाय का ?

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना.:-   

१) मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क माफी व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची योजना.
२) राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना.
३) वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.
४) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना.
५) मागासवर्गीयांसाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना

समाज कल्याण विभागाच्या विविध योजना.

६) अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य करण्याची योजना
७) कर्मवीर दादासाहेब गायकवाड अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे सबलीकरण व स्वाभिमान योजना

समाज कल्याण विभागाच्या योजना.

८) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना
९) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे. (दलीत वस्ती विकास योजना.)
१०) संजय गांधी निराधार अनुदान योजना.

११) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना.
१२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना.
१३) राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
१४) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
१५) आम आदमी विमा योजना
१६) मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविण्यासाठी स्वेच्छा संस्थांना अनुदान देणे.
१७) कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्याला अर्थसहाय्य.
१८) ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
१८) अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सहाय्याची योजना.
१९) आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर सहाय्य योजना.

संदर्भ: महाराष्ट्र वार्षिकी, २०१८, महाराष्ट्र शासन, पृष्ठ- १४४-१४५,
नागरिकांची सनद, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,

समाज कल्याण विभागाच्या योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध हक्क समिती – महाराष्ट्र

आपल्यातील या पैकी कोणीही नियमांमध्ये पात्र होत असेल तर, याचा फायदा नक्की घेतला पाहिजे तसेच जवळील कार्यालय भेट द्यावी.