12 पास उमेदवारांसाठी निघाली रेल्वेत भरती

Railway Recruitment 2023 – 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे विविध रिक्त पदांसाठी एक भरती आयोजित करण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून विविध पदाच्या तब्बल 295 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स येथे होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून सदर संस्थेत अप्रेंटिसच्या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

कोणत्या आणि किती पदासाठी होणार भरती?

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन 140 पदे, मेकॅनिक (डिझेल): 40 पदे, मशिनिस्ट: 15 पदे, फिटर: 75 पदे, वेल्डर: 25 पदे अशा एकूण 295 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदानुसार किमान दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागेल

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. plw.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीमध्ये सादर करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. परंतु उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर कुठल्याही सबबीवर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

इथे ही वाचा

शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मिळणार

दररोज फक्त 50 रुपये गुंतवून तयार करा 35 लाख रुपयांचा निधी

मतदान यादीत नाव शोधणे