पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात

देशातील 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी जमा

भागलपूर, 24 फेब्रुवारी (हिं.स.) : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या कात्यात जामा झाला आहे. या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये मिळाले असून देशातील 9 कोटी 8 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून 22 हजार कोटी रुपये वळते झाले आहेत. बिहारच्या भागलपूर येथून पंतप्रधानांनी आज, सोमवारी हा हप्ता जारी केला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपयांची ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 19 वा हप्ता जमा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ट्विटरवर दिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, पीएम किसान योजनेला 6 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. हे माझ्यासाठी खूप समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत ​​आहे.

गेल्या 10 वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला आहे. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतील त्यांची उपलब्धता वाढली आहे. यासोबतच शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्नही वाढले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.

read also

Car ची बॅटरी डाऊन झाली? या पद्धतीने सहज सुरू करा गाडी!

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात पृथ्वीवर येण्याची शक्यता 

महाकुंभमेळ्याला ‘फालतू’ म्हणणार्‍या लालूप्रसाद यादवांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !  – हिंदु जनजागृती समिती

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon