खुशखबर! पिक विमा भरण्यासाठी ई पीक नोंदणी सक्तीची नाही

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी पीक पेरणी नोंद सक्तीची असल्याबाबत अनेक ठिकाणी सांगण्यात येत आहे.

मात्र शासनाच्या ई पीक पाहणीमध्ये नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस् पासून सुरू होत असल्याने राज्याच्या कृषी आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागासाठी पीक नोंदणी सक्तीची नाही,

असे शासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. राज्यात २०२२-२३ आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप २०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै आहे. 

शासनाच्या ई पीक पाहणीमध्ये पिक पेराची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई पीक पाहणी नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो.

शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पिक यामध्ये काही तफावत आढळल्यास पीक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल,

असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणापत्रद्वारे  पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.