शिवसेनेच्या 40 आमदारांना मनसेमध्ये घेण्यासाठी फडणवीस-ठाकरे भेट?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे 40 आमदार सध्या भाजपकडे आश्रयीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटालाच खरी शिवसेना म्हणत आहेत. पण हे प्रकरण अजून न्यायालयात प्रलंबित आहे. या आमदारांना घेऊन शिंदेंना आता त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्यावाचून गत्यंतर नाही.

कारण कायद्याप्रमाणे एखाद्या पक्षातील दोन तृतीअंश आमदार फुटले आणि त्यांनी जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही. शिंदे गटाला राज यांच्या पक्षात सामावून घेता येईल का? या चर्चेसाठी फडणवीस ठाकरेंना भेटले असावे

शिंदे गटाच्या 40 आमदारांना भाजपमध्ये जायचे नसल्याने त्यांना मनसेमध्ये सामावून घेण्यासंदर्भातील चर्चा ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली का? अशी शंका तपासे यांनी उपस्थित केली. 105 आमदारांचा पक्ष असलेला नेता एक आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला भेटायला गेला असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.