सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी

गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला आहे.

लढत सुरु झाल्यानंतर झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि चितपट करुन विजय मिळवला.

सिकंदर शेख ला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा तसंच महिंद्रा थार ही गाडी मिळवली

त्याच्या घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा आहे. सिकंदरचे वडील रशिद शेखही पैलवानी करायचे.

“माझ्या विजयाचं श्रेय माझे वडील आणि माझे कोच यांना जातं

२२ वर्षांचा सिकंदर शेख हा कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे.

मी मागचे सहा ते सात महिने कसून सराव केला. मला आता देशासाठी मेडल आणण्याची इच्छा आहे”