तुमच्या पॅन कार्डवर कोणी 'लोन' तर घेतलेलं नाही ना..? घरबसल्या 'या' टिप्स फाॅलो करुन चेक करा

पॅन कार्ड नंबरचा गैरफायदा घेत कुणीतरी कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

तुमच्या पॅनकार्डसोबतही अशीच छेडछाड होऊ शकते हा धोका ओळखून तुम्ही देखील अशाच फ्रॉडचे बळी ठरलेले तर नाही ना? हे नक्कीच तपासू शकता.

सध्या पॅनकार्ड नंबरचा दुरूपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत त्यामुळे पॅन कार्ड शेअर करताना काळजी घ्या.

 पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून जाणून घ्या कसे रहाल सुरक्षित?

पॅन नंबरचा गैरवापर झालाय का? हे तुम्ही क्रेडिट स्कोअर जनरेट करून तपासू शकता.

CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark यांच्या माध्यमातूनही तुमच्या नावावर कुणी कर्ज घेतलय का? हे तपासू शकता.

Paytm किंवा Bank Bazaar या fintech platforms वरून देखील कर्जाची माहिती मिळू शकते. तुमचं नाव, जन्मतारीख, तुमच्‍या पॅन कार्ड तपशीलांसह तुम्ही पडताळणी करू शकता.

 फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी. तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नये. कारण ही कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात.

जर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी शेअर करणे अनिवार्य असेल तर त्या फोटोकॉपीवर शेअर करण्याचा उद्देश लिहावा. चित्रावर ओळीचा काही भाग दिसेल अशा प्रकारे लिहा. ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा