ईपीएफओ बोर्डाने अलीकडेच 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर आणला आहे
ज्यावर टीका होत आहे. ईपीएफओ आता आपल्या खातेधारकांना जास्त परतावा देण्याची योजना आखते आहे.
यानुसार ईपीएफओ बोर्ड शेअर बाजारातील गुंतवणूक मर्यादा वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.
म्हणजेच ईपीएफओचा जो फंड शेअर बाजारात गुंतवला जातो, त्याचे प्रमाण वाढवले जाऊ शकते.
त्यातून अधिक परतावा मिळत पीएफ खातेधारकांना अधिक फायदा मिळेल, अशी अपेक्षा आहे. 29 आणि 30 जुलै 2022 रोजी ईपीएफओ बोर्डाची बैठक होणार आहे.
या बैठकीत शेअर बाजार आणि संबंधित गुंतवणूक प्रकारांमध्ये म्हणजे इक्विटी प्रकारातील गुंतवणुकीची सध्याची मर्यादा
15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.
ईपीएफओ बोर्डाने हा निर्णय घेतल्यास गुंतवणुकदारांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळेल.