शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत पीक कर्ज व्याजात सवलत

नांदेड, 4 मार्च (हिं.स.) : केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) धारक शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजात पाच लाख रुपये पर्यंतची सवलत मंजूर केली आहे. हे पीक कर्ज फलोत्पादन,पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना लागू आहे. त्याचप्रमाणे विनातारण कर्जाची मर्यादा सुद्धा आता दोन लाखापर्यंत करण्यात आली आहे. या संदर्भाचे आदेश कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेटनंतर वेबिनारमध्ये देण्यात आले. केंद्र सरकारने बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी पीककर्ज व इतर विषयावर तरतुदी केल्या आहेत.

या संदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने कृषी मंत्रालयाने देशात विविध ठिकाणी कृषी आणि ग्रामीण समृद्धीवर बजेटनंतर वेबिनारचे आयोजन केले होते. नांदेड जिल्ह्यामध्ये SBI RSETI नांदेड येथे वेबिनार पार पडला. जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ऑनलाइन संवाद साधला. विविध योजनेची माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकार द्वारा २०२५-२६ पासून पात्र केसीसी धारकांना कर्ज व्याज सवलत योजना वाढीव मर्यादा देण्यात आल्याचे सांगितले.

पूर्वी व्याज सवलत तीन लाख रुपये मिळत होती. आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेमुळे लहान व मध्यम शेतकऱ्यावरील वित्तीय ताण कमी होईल. ही योजना पीक कर्ज फलोत्पादन, पशुसंवर्धन तसेच मस्त्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना लागू आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व बँकेद्वारे शेती कर्जासाठी आता विनाकारण कर्ज मर्यादा दोन लाखापर्यंत करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी SBI RSETI संचालक अशोकनाथ शर्मा यांचे सहकार्य लाभले व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अनिल गचके यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Admin  के बारे में
For Feedback - karjayojana@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon